​‘त्या’ विकृत नराधमाच्या मुसक्या आवळल्या

​‘त्या’ विकृत नराधमाच्या मुसक्या आवळल्या


अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करत व्हिडीओ बनवला : खरवंडीतील घृणास्पद प्रकाराने सर्वत्र संताप


​वडाळा बहिरोबा (संदिप मोटे ) –
पैसे व खाऊ देण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन शाळकरी मुलासोबत घृणास्पद लैंगिक कृत्य करणाऱ्या नूरखान बाबुलशहा शेख (वय-५०), रा. खरवंडी, ता. नेवासा, या विकृत नराधमावर शनीशिंगणापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
​या अत्यंत किळसवाण्या तसेच संतापजनक प्रकाराचे मोबाईलवर सहकाऱ्याच्या मदतीने व्हिडीओ काढल्यानंतर त्यांच्याकडून तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याच्या करामती चव्हाट्यावर येऊन ग्रामस्थांत प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
​पिडीत अल्पवयीन मुलाच्या चुलत्याने शनीशिंगणापूर पोलीस ठाण्यात दि. २२ जुलै २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून शेख याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम ३५१(३) सह पोक्सो कायदा कलम ४, ८, १३, १४, १५ नुसार गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले आहे.
​शेख याने संबंधित अल्पवयीन मुलाला पैसे व खाऊ देण्याचे आमिष दाखवून स्वतःच्या शेतातील कोपीत नेऊन त्याच्यासोबत घृणास्पद लैंगिक कृत्य केल्याचा गंभीर, संतापजनक आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच झालेल्या प्रकाराबाबत कुठे वाच्यता केल्यास शेख याने जीवे ठार मारण्याची धमकी पिडीत मुलाला दिल्याचेही या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
​धक्कादायक म्हणजे या किळसवाण्या कृत्याचे मोबाईलवरून व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आल्याने शेख याच्यासोबत आणखीही काही व्यक्ती सहभागी असल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
​फासावर लटकवा
​नातवंडाच्या वयाच्या अल्पवयीन मुलाला पैसे व खाऊ देण्याचे आमिष दाखवून त्याच्यासोबत घृणास्पद लैंगिक कृत्य करतानाचे व्हिडीओ चित्रीकरण करणारा संबंधित आरोपी विकृत मानसिकतेचा नराधम असल्याने त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फक्त आणि फक्त फाशीचीच शिक्षा होण्याची अपेक्षा खरवंडी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.


​हा प्रकार केव्हापासून सुरु आहे?, यात आणखीही काही मुलांचे शोषण संबंधितांनी केले आहे काय? या प्रश्नांचा उलगडा होण्यासाठी पोलिसांनी कसून तपास करून सत्य उघडकीस आणण्याबरोबरच संबंधितांना कठोरात कठोर शासन करण्याची मागणी होत आहे.
​शनीशिंगणापूरचे पोलीस उपनिरीक्षक गिरीश केदार या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!