*नेवासा पोलिसांचा दणका! रात्रीच्या काळोखात पन्नास किलो गांजा जप्त; पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या धाडसी कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा वर्षाव*

*नेवासा पोलिसांचा दणका! रात्रीच्या काळोखात पन्नास किलो गांजा जप्त; पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या धाडसी कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा वर्षाव*

नेवासा | विशेष प्रतिनिधी:
नेवासा पोलीस ठाण्याचे धडाडीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रात्रीच्या काळोखात एक अत्यंत धाडसी आणि धडक कारवाई करत तब्बल ५० किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील गांजा तस्करीविरोधातील आजवरची सर्वांत मोठी कारवाई मानली जात असून, या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्हाभरातून पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या टीमचे भरभरून कौतुक केले जात आहे.

​ *गुप्त बातमी अन् लोकेशन ट्रॅकिंग;*वाकडी शिवारात पडला छापा*

​नेवासा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती थेट पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता, दराडे यांनी अत्यंत कौशल्याने आणि गुप्ततेने चक्र फिरवली.

*वरिष्ठांचे मार्गदर्शन अन् गुप्त बातमीवरून लोकेशन ट्रॅकिंग*

​नेवासा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती थेट पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ ही बाब पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या निदर्शनास आणून दिली. वरिष्ठांकडून हिरवा कंदील मिळताच क्षणाचाही विलंब न लावता, दराडे यांनी अत्यंत कौशल्याने चक्र फिरवली.
​आरोपींना जाळ्यात पकडण्यासाठी वेगवेगळी विशेष पथके तयार करण्यात आली. आरोपींचे लोकेशन ट्रॅक करत पोलीस निरीक्षक दराडे यांनी आपल्या पथकांसह रात्रीच्या अंधारात वाकडी शिवारातील संशयित ठिकाणावर अचानक छापा टाकला

​. *पोलिसांचा छापा पडताच तस्करांची तारांबळ उडाली.*
या कारवाईत पोलिसांनी ५० किलो गांजाचा साठा हस्तगत करत तस्करांचे मनसुबे उधळून लावले.

​ *तरुणाई आणि विद्यार्थ्यांचे आयुष्य वाचले!*​

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जप्त केलेला हा गांजा तालुक्यातील विविध भागांत, विशेषतः कॉलेजच्या तरुण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जाणार होता. तरुण पिढीला अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढणाऱ्या या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सतर्कतेमुळे वेळेत झाला. त्यामुळे शेकडो तरुण विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले असून, पालकांनीही निःश्वास सोडला आहे.

​ *खाकीची मान उंचावली!*
नेवासा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हेगारांवर आपला चांगलाच वचक निर्माण केला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक आणि धाडसी कारवाईमुळे पोलीस दलाची मान संपूर्ण जिल्ह्यात अधिक उंचावली आहे.
​”तालुक्यात अवैध धंदे आणि अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; असा कोणताही प्रकार आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल,” असा सज्जड इशारा पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिला आहे.
​या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध धंदेवाल्यांचे आणि अमली पदार्थ तस्करांचे धाबे चांगलेच दाणवले आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप दराडे यांच्या विशेष पथकाने केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!