सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ नेवाशात ‘गुरु-शिष्य आक्रोश मोर्चा’; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी

**नेवासा:**
दिल्ली येथे उपोषणास बसलेले ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ आणि विद्यार्थी व प्रशिक्षणार्थींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज नेवासा शहरात **‘गुरु-शिष्य आक्रोश मोर्चा’** काढण्यात आला. आंदोलकांनी परिसर दणाणून सोडत तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ आणि सरकारविरोधी घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गांवरून तहसील कार्यालयावर धडक दिली.

मुख्य मागण्या:
* **शिक्षणाधिकार्यांचा राजीनामा:** नीट (NEET) पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी करून नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा.
* **टीईटी घोटाळा चौकशी:** टीईटी (TET) पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी करून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
* **वयोमर्यादा व पारदर्शकता:** महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा वाढवण्यात यावी.
* **कठोर कायदा:** सर्व शासकीय भरती परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घ्याव्यात आणि भविष्यात पेपर फुटी रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा.
विद्यार्थ्यांच्या या रास्त मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
प्रमुख उपस्थिती:
या आक्रोश मोर्च्यात विद्यार्थी संघटनांचे आकाश धनवटे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रंजनदादा जाधव, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शुभम बंब, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, सोनई तंटामुक्ती अध्यक्ष गणेश गडाख, नेवासा व्यापारी संघटनेचे कुणाल मांडण, भारतभाऊ कोकणे, गणेश सोनवणे, शहर काँग्रेसचे अंजुम पटेल, ‘मी वडार’ संघटनेचे संदीप कुसळकर, ॲड. जैद शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पोद्दार, राहुलभाऊ सूर्यवंशी, इरफानभाई शेख, अरुणभाऊ जाधव, मोहनमामा भवाळ, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी अनिकेत अंबाडे, अतिश धनवटे, सोमेश्वर नवगिरे, कैलास मस्के, सचिन जाधव, इंजिनिअर अमोल मिसाळ, समाधान जाधव, सिद्धांत कांबळे, अमन सय्यद, ऋषिकेश जंगम, मच्छिंद्र जाधव, अश्फाक शेख, सुयश बेलेकर, इम्रान शेख, निखिल विरकर, अजिंक्य आठरे आणि दीपक वाघ यांच्यासह शेकडो विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.