भेंडा येथे विनापरवाना कर्कश डीजे वाजवणाऱ्यावर नेवासा पोलिसांची धडक कारवाई; वाहनासह डीजे साहित्य जप्त

भेंडा येथे विनापरवाना कर्कश डीजे वाजवणाऱ्यावर नेवासा पोलिसांची धडक कारवाई; वाहनासह डीजे साहित्य जप्त

कुकाणा / भेंडा (विशेष प्रतिनिधी):

गणेशोत्सव, नवरात्र आणि दसरा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांनी डीजे आणि डॉल्बी सिस्टीम वाजवण्यावर घातलेल्या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर नेवासा पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. भेंडा (ता. नेवासा) येथे विनापरवाना कर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी डीजे साहित्यासह वाहन जप्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये (अन्वये क्र. डी सी कार्य ९ ब १ /२१३५/२०२६, दि. १२/०९/२०२६) दि. १४ सप्टेंबर २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अहिल्यानगर शहर व ग्रामीण भागात डीजे/डॉल्बी वाजवण्यास सक्त बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही भेंडा येथे विनापरवाना व अत्यंत कर्कश आवाजात डीजे सिस्टीम लावून गाणी वाजवली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन विचारपूस केली असता, डीजे वाजवण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे समोर आले. संबंधित चालकाने त्याचे नाव आकाश सुनील आढागळे (रा. सौंदाळा, ता. नेवासा) असे सांगितले. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल हरीभाऊ पंढरीनाथ धायतडक (बॅच क्र. १७३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकाश आढागळे याच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७९३/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान डीजे सिस्टीम आणि वाहन जप्त करण्यात आले आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा वाघमोडे करत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नीरज राजगुरू आणि नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल बी. काळोखे, शाहजी आंधळे, बाबा वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर रसाळ, हरी धायतडक, अमोल डमाळे, पो.कॉ. वाघ, शेकडे तसेच होमगार्ड बबलू चव्हाण, गंगावणे, अरबाज शेख व वायकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

शासकीय आदेशांचे उल्लंघन करून नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!