**शांत, संयमी अन् कर्तव्यदक्ष! नेवासा पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या धडाकेबाज कामगिरीने अवैध धंदेधारकांचे धाबे दणाणले**

**नेवासा:**

नेवासा पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यापासून आपल्या कामाची एक वेगळी छाप पाडणारे पोलीस निरीक्षक सागर ढिकले सध्या आपल्या विशेष कार्यशैलीमुळे चर्चेत आहेत. ‘शांत, संयमी मात्र कर्तव्यात कठोर’ अशी ओळख निर्माण केलेल्या ढिकले यांनी अल्पावधीतच नेवासा तालुक्यात गुन्हेगारांवर वचक बसवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे.

**अवैध धंद्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’**

सागर ढिकले यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम उघडली आहे. विशेषतः नेवासा फाटा परिसरातील लॉजमध्ये चालणारे संशयास्पद व्यवसाय, अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांवर त्यांनी धाडसी कारवाया केल्या आहेत. त्यांच्या या धडक कारवाईमुळे अनेक वर्षांपासून फोफावलेल्या अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले असून, अशा प्रवृत्तींना त्यांनी कडक इशारा दिला आहे.

**सिंघम स्टाईल नाकाबंदी आणि गुन्हेगारीला लगाम**

केवळ कारवायांवर न थांबता, परिसरात शिस्त लावण्यासाठी ढिकले यांनी ठिकठिकाणी प्रभावी नाकाबंदी आणि पेट्रोलिंगवर भर दिला आहे. यामुळे चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होत असून, रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. कामाच्या ठिकाणी ‘कमी बोलणे आणि जास्त काम करणे’ या त्यांच्या वृत्तीमुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा सुधारत असल्याचे चित्र दिसत आहे.

**जनतेचा विश्वास ढिकले यांचा खाकी बाणा नागरिकांकडून समाधान व्यक्त**

नेवासा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमधून ढिकले यांच्या कार्यपद्धतीचे स्वागत होत आहे. महिलांची सुरक्षा, तरुणांमधील वाढते व्यसनाधीनता रोखण्यासाठी त्यांनी उचललेली पावले कौतुकास्पद ठरत आहेत. “पोलीस प्रशासन जर अशा प्रकारे सक्रिय राहिले, तर गुन्हेगारीमुक्त नेवासा होण्यास वेळ लागणार नाही,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

 

चौकट- नेवासा तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्था राखणे हीच माझी प्राथमिकता आहे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची वेळ केली जाणार नाही आणि सर्वसामान्य सुरक्षित वाटावे यासाठी आमचा लढा असाच सुरू राहील

 सागर ढिकले (पोलीस निरीक्षक नेवासा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!