**गणेश झगरे यांची शिवसेना (उबाठा) भानसहिवरा गटप्रमुख आणि तालुका मीडिया प्रमुखपदी निवड**
**नेवासा | वार्ताहर**
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते गणेश झगरे यांची पक्षातील सक्रियता आणि निष्ठेची दखल घेत त्यांची भानसहिवरा जिल्हा परिषद गटप्रमुख तसेच नेवासा तालुका मीडिया प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. या दुहेरी जबाबदारीमुळे तालुक्यात पक्षाच्या संवाद यंत्रणेला अधिक बळकटी मिळणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने, तसेच जिल्हाप्रमुख रावसाहेब नाना खेवरे व उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. नेवासा तालुक्याचे ज्येष्ठ नेते मुन्नाभाई चक्रनारायण यांच्या हस्ते गणेश झगरे यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले.
**मक्तापूर ग्रामस्थांकडून जंगी स्वागत**
निवडीचे पत्र घेऊन गावात आगमन होताच मक्तापूर ग्रामस्थांच्या वतीने गणेश झगरे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतिशबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात त्यांचा सत्कार करण्यात आला. “पक्षाने दिलेल्या या जबाबदारीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि संघटनेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन,” असा विश्वास झगरे यांनी यावेळी व्यक्त केला.
**मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव**
या निवडीबद्दल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास गोल्हार, तालुकाप्रमुख मच्छिंद्र मस्के, मुन्नाभाई चक्रनारायण, शहर प्रमुख नितीन जगताप, योगेश राऊत, पत्रकार बादल परदेशी, आबासाहेब शिरसाठ, सचिन गायकवाड यांच्यासह शिवसैनिकांनी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.