कमिका एकादशीला नेवासेत जनसेवा सामाजिक संस्थेची ‘पोलीस मित्र’ म्हणून उत्कृष्ट सेवा.

नेवासे शहर ता.१०
‘कमिका एकादशी’ निमित्ताने जनसेवा सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य च्या वतीने नेवासे येथे पोलीस विभागाला सहकार्य म्हणून उत्कृष्ट सेवा बजावण्यात आली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आकाश बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ५० हून अधिक स्वयंसेवकांनी पहाटेपासूनच कामाला सुरुवात केली. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन संस्थेने पोलीसांच्या मार्गदर्शनावाखाली वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था, दर्शनासाठी रांग लावणे आणि ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे अशी जबाबदारी पार पाडली.
विशेषतः मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि वाहनांसाठी शिस्तबद्ध पार्किंग करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. यामुळे पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी झाला. संस्थेच्या या शिस्तबद्ध व सेवाभावी कार्याचे पोलीस विभागाने व श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांनी कौतुक केले.
या उपक्रमात संस्थेच्या उपाध्यक्षा सिद्दीकाताई जाधव, नेवासे तालुका अध्यक्ष सुनील साठे व उपाध्यक्ष सलमान पठाण यांनी पुढाकार घेऊन नियोजन केले. धार्मिक सोहळ्यात सामाजिक संस्थेने दाखवलेल्या तत्परतेमुळे भाविकांनीही समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे समाजात सेवाभाव वाढतो, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
जनसेवा सामाजिक संस्था नेहमी पोलिस दलाच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तात मदत करते व यापुढे देखील अशीच सेवा देण्याचे कार्य करू.
आकाश बागुल
संस्थापक अध्यक्ष