नेवासा सुवर्णकार संघटनेच्या अध्यक्षपदी श्री मनोज डहाळे बिनविरोध निवड सर्वत्र अभिनंदन

नेवासा सुवर्णकार संघटनेच्या अध्यक्षपदी श्री मनोज डहाळे बिनविरोध निवड सर्वत्र अभिनंदन

नेवासे शहर ता.१०
नेवासे शहरातील व्यापारी(गोल्ड व्हॅल्यूवर)श्री. मनोज डहाळे यांची सुवर्णकार संघटनेच्या नेवासे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

सुवर्णकार संघटनेची गुरुवारी बैठक पार पडली. यावेळी सर्वानुमते मनोज डहाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. व्यवसायातील उत्कृष्ट अनुभव, सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची कार्यपद्धती लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे.

निवडीनंतर मनोज डहाळे यांनी सांगितले की, “सुवर्णकार बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी व संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन. सुवर्णकार समाजासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नशील राहील

त्यांच्या निवडीबद्दल नेवासे शहर व तालुक्यातील व्यापारी वर्ग, सुवर्णकार बांधव व विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!