विद्यार्थ्यांना प्रगतीपुस्तकासोबत आता..,राज्यातील शालेय निकालात १ मे पासून मोठे बदल!

मुंबई : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी यंदाचा निकाल १ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहे. यंदा निकालाबरोबरच शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वाचा बदलही लागू होत आहे. केवळ गुणपत्रिका देण्याची पद्धत बदलून आता विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाही पालकांना दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
१ मे रोजी निकाल, २ मेपासून सुट्टी

शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा निकाल १ मे रोजी जाहीर केला जाईल. निकाल जाहीर होताच दुसऱ्या दिवशी म्हणजे २ मेपासून राज्यातील सर्व शाळांना अधिकृतपणे उन्हाळी सुट्टी लागू होणार आहे. नव्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात सुरळीत व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्तरपत्रिका दाखवणे अनिवार्य

यंदा विद्यार्थ्यांना केवळ प्रगतीपुस्तक देण्यावर मर्यादा न राहता त्यांच्या उत्तरपत्रिकाही पालकांना दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांनी परीक्षेत नेमके काय लिहिले, कुठे चुका केल्या आणि त्यांचे आकलन कितपत आहे, याची स्पष्ट कल्पना मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *