प्रत्येक मातेने जिजाऊ माँ साहेबांसारखे ज्ञान आपल्या मुलांना देणे आवश्यक-सौ.अंजना सोनवणे
नेवासा(प्रतिपादन)नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथील सुदर्शन न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी प्रत्येक मातेने जिजाऊ माँ साहेबांसारखे ज्ञान आपल्या मुलांना देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आदर्श शिक्षिका सौ.अंजनाताई सोनवणे यांनी यावेळी बोलतांना केले.
अखंड हिंदूस्थानात स्वराज्य स्थापन व्हावे, याकरीता राजमाता जिजाऊ मा साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना बालवयातच स्वातंत्रयाचे धडे दिले ,पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिद्दीने मावळयांना बरोबर घेऊन स्वराज्याचे स्वप्न साकार केले,
आज पुन्हा एकदा समाजामध्ये प्रत्येक आईने जिजाऊ मा साहेबासारखे ज्ञान आपल्या मुलांना दिले पाहीजे ,मोठ्यांचा आदर ,शिक्षणाची जिद्द गुरू विषयी आदर मुलांनी ठेवला पाहीजे ,आज मुले मोबाईल च्या आहारी गेले आहेत ,त्यांना आईने शिक्षणाचे महत्व सांगीतले पाहीजे असे मत त्यांनी यावेळी बोलतांना मांडले.प्रास्ताविक कैलास कर्जूले यांनी केले तर गणेश कचरे यांनी सूत्रसंचालन केले आभार मुख्याध्यापक शकूर इनामदार यांनी मानले
