महाधडाका! नामदार भरतशेठ गोगावले यांचे पीए मनोज जाधव यांना राज्य शासनाचा मानाचा ‘कृषी सेवारत्न पुरस्कार’ जाहीर!

जलसंधारण, शेती प्रयोग आणि लोकाभिमुख सेवेची मोठी पावती; १ जुलै रोजी होणार भव्य गौरव!**


प्रतिनिधी (कमलेश गायकवाड) / मुंबई:
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि आदराचा मानला जाणारा “पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार” यंदा मंत्री भरतशेठ गोगावले यांचे स्वीय सहाय्यक (PA) तथा सहायक कृषी अधिकारी श्री. मनोज सुमन मोहन जाधव यांना जाहीर झाला आहे. जाधव यांच्या कृषी क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीची, अद्वितीय प्रयोगांची आणि अहोरात्र चालणाऱ्या शेतकरी सेवेची दखल घेत राज्य सरकारने हा सर्वोच्च सन्मान जाहीर केला असून, आगामी १ जुलै रोजी ‘कृषी दिना’च्या शुभमुहूर्तावर हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या कृषी वर्तुळात आनंदाला उधाण आले असून, युवा कृषी अधिकाऱ्यांमध्ये एक नवा उत्साह संचारला आहे.
शेतकऱ्यांचे कैवारी अन् प्रयोगांचे चक्रवर्ती: मनोज जाधव यांचे क्रांतीकारी कार्य!
श्री. मनोज जाधव यांनी केवळ शासकीय नोकरी न करता, कृषी क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळातील काही मैलाचे दगड खालीलप्रमाणे आहेत:
जलकुंड आणि भात शेतीचे यशस्वी प्रयोग: पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी येथे त्यांनी *जलकुंड उपचार आधारित फळबाग लागवडीचा’ अत्यंत अभिनव प्रयोग यशस्वी केला, ज्याची दखल थेट शासनाला घ्यावी लागली. तसेच देवपूर येथे **’भात टोकन शेतीचा’ यशस्वी पॅटर्न राबवून त्यांनी भात उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श ठेवला.
जलसंधारणात अव्वल कामगिरी:देवळे गावाला ‘प्री वॉटर कप स्पर्धेत’ जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. जलयुक्त शिवार आणि मृदसंवर्धनाच्या कामात सलग चार वर्षे त्यांनी जनतेला सोबत घेऊन जलक्रांती घडवून आणली.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना नवजीवन:यवतमाळ सारख्या संवेदनशील जिल्ह्यातील अंजनखेड, शारी आणि राणी धानोरा या गावांमध्ये जाऊन त्यांनी आत्महत्याग्रस्त व आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी कुटुंबांना आधुनिक व शाश्वत शेतीचे धडे दिले. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे अनेक कोमेजलेली पिके आणि संसार पुन्हा हसले.
महाराष्ट्रभर ‘कृषी सल्लागार’ म्हणून नावलौकिक: आंबा घन लागवड, स्ट्रॉबेरी उत्पादन आणि आधुनिक बागायती व्यवस्थापनात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सत्तेच्या केंद्रात राहूनही जपली सामान्यांची नाळ!
नामदार भरतशेठ गोगावले यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करताना मनोज जाधव यांनी कधीही आपल्यातील ‘कृषी अधिकारी’ आणि ‘समाजसेवक’ मागे पडू दिला नाही. मंत्रालयापासून ते थेट शेताच्या बांधापर्यंत येणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला, शेतकऱ्याला तत्परतेने मदत करणे हा त्यांचा स्वभाव राहिला आहे. त्यांची अभ्यासू वृत्ती, कर्तव्यदक्षता आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व यामुळेच आज कृषी विभाग आणि राजकीय-सामाजिक स्तरावर त्यांच्याबद्दल प्रचंड आदराची भावना आहे.
> अभिनंदनाचा महापूर!
> पुरस्काराची घोषणा होताच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी तसेच राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी श्री. मनोज जाधव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा पुरस्कार म्हणजे एका खऱ्या कृषी योद्ध्याचा सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे.
>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!