टोका प्रवरासंगम येथे आशीर्वादित प्रार्थना सभेला भाविकांचा प्रतिसाद
नेवासा(प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील टोका येथील समाज मंदिर प्रांगणात भारतीय लहुजी सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शांतवन खंडागळे यांच्या पुढाकाराने सोमवारी दि.२२ जून रोजी सायंकाळी आयोजित केलेल्या आशीर्वादित प्रार्थना सभेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी झालेल्या प्रार्थना सभेला हैदराबादचे ख्रिस्ती धर्मगुरू पास्टर किरण जोशी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते त्यांनी आजारी लोकांसाठी आरोग्यदानाची प्रार्थना वचने गायन व पवित्र पाणी शिंपडून केली. कार्यक्रम संयोजक शांतवन खंडागळे यांनी प्रार्थना सभेला आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी व त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी दरवर्षी आपण हा उपक्रम राबवून राष्ट्रीय ऐक्य वाढीसाठी आपल्या प्रयत्न व उद्देश असल्याचे सांगितले.
यावेळी झालेल्या प्रार्थना सभा कार्यक्रम प्रसंगी किरण पातारे,दिलीप खंडागळे,माधव शिरसागर, नंदलाल सोनवणे,प्रा.लक्ष्मण भवार,सुमित खंडागळे,शुभम सरोदे,बबन खंडागळे, तुषार खंडागळे,आशिष वाल्हेकर, महिला मंडळाच्या सदस्या सुनिता वैरागर,शकुंतला नवगिरे,वैशाली खंडागळे, रेखा काळे,वैशाली सरोदे, इंदुबाई सोनवणे, मंदाबाई खंडागळे,अलका शेलार, छबुबाई खंडागळे, ताराबाई लहीरे,जनाबाई शिरसागर, शितल खंडागळे सुनीता खंडागळे,अंजली सोनवणे, यशोदाबाई खंडागळे मनीषा खंडागळे उपस्थित होते. शांतवन खंडागळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थित भाविकांचे आभार मानले.