
संगमनेर येथे देखील सानिया पठाण हिचा जयश्री थोरात यांनी निवडी बद्दल सन्मान केला .
नेवासे शहर ता.३०
परिस्थितीवर मात करून जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यशाला गवसणी घालत नेवासे शहरातील कु. सानिया निसार पठाण हिने दाखवून दिले आहे. तिची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल नेवासे येथे तिचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
सानिया हिने मिळवलेले हे यश तिच्या अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि संघर्षमय प्रवासाचे फलित आहे.
वडील व्यवसायाने फिटर असलेल्या सानियाला लहानपणापासूनच खाकी वर्दीचे आकर्षण होते.
घरची परिस्थिती बेताची असतानाही तिने हार मानली नाही. खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून तिने अहोरात्र मेहनत घेतली. लेखी परीक्षा, मैदानी चाचणी आणि मुलाखत या सर्व टप्प्यांवर तिने यशस्वी कामगिरी करून पोलीस दलात स्थान मिळवले.
सानियाचा हा संघर्षमय प्रवास अनेक युवक-युवतींसाठी प्रेरणादायी आहे नेवासे व संगमनेर येथे झालेल्या सत्कार कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी तिच्या कर्तृत्वाचे कौतुक केले.