देवगड संस्थानच्या वतीने पंढरपूर येथील मठामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा

देवगड संस्थानच्या वतीने पंढरपूर येथील मठामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा

नेवासा(प्रतिनिधी)आषाढी वारी निमित्त नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड संस्थानच्या वतीने पंढरपूर येथील मठामध्ये श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा पालखी सोहळयाच्या निमित्ताने राष्ट्र संत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली अखंड हरिनाम सप्ताह व नामदेव गाथा पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.२० जुलै रोजी पंढरपूर येथील मठापासून श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांची पालखी दिंडी पंढरपूर नगरीत क्षेत्र प्रदक्षिणा करण्यासाठी निघणार आहे.
पंढरपूर येथे होणाऱ्या सात दिवशीय या सोहळयात नामदेव गाथा पारायण व पंढरपूर क्षेत्र प्रदक्षिणा दिंडी सोहळयासाठी भाविक हे दि.१९ जुलै रोजी पंढरपूरला जाण्यासाठी आपापल्या वाहनांनी प्रस्थान करणार आहे.  दि.२० जुलै रोजी सकाळी ७ वाजता गुरूदेव दत्त पिठाचे महंत राष्ट्र संत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली  पंढरपूरच्या देवगड मठापासून पंढरपूर नगरीत क्षेत्र प्रदक्षिणा करण्यासाठी श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांची पालखी दिंडी निघणार आहे.
क्षेत्र प्रदक्षिणा दिंडीचे हे पाचवे वर्ष आहे क्षेत्र प्रदक्षिणा दिंडीचा समारोप रिंगण कार्यक्रमाने मठाच्या प्रांगणात होईल.दि.२१ जुलै पासून नामदेव गाथा पारायण सोहळयास सुरूवात होणार आहे.या सोहळयात सकाळी ४ ते ६ काकडा, आरती, सकाळी ७ ते ८ गीता पठण,९ ते ११ श्री नामदेव गाथा पठण,११ ते १२ भोजन प्रसाद,दुपारी ३ ते ५ श्री नामदेव गाथा पारायण,सायंकाळी ५.३० ते ७ हरिपाठ, आरतीनंतर भोजन, रात्री ८.३० ते १० कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे
गाथा पारायण सोहळयासाठी व्यासपीठ प्रमुख देवगडचे संतसेवक हभप नारायण महाराज ससे,हभप गणपत महाराज आहेर,हभप रामनाथ महाराज पवार, हभप संजय महाराज निथळे,मृदुंगाचार्य गिरीजीनाथ महाराज जाधव,बाळू महाराज कानडे,तात्या महाराज शिंदे,लक्ष्मण महाराज नांगरे, रोहित महाराज पटारे,गणेश महाराज तनपुरे,शशिकांत महाराज कोरेकर, सोमनाथ महाराज पानकडे यांच्यासह देवगड संस्थानचे विद्यार्थी मंडळ हे सेवा देणार आहे.
या सोहळयाची जय्यत तयारी देवगड संस्थान श्री गुरूदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत राष्ट्र संत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व  देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील देवगड मठामध्ये सुरू झाली आहे.क्षेत्र प्रदक्षिणा दिंडीत आषाढी वारीचा आनंद घेण्यासाठी व गाथा पारायणासाठी येणाऱ्या भक्तांच्या स्वागतासाठी श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा भक्त निवास पंढरपूर हे सज्ज झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!