अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या नेतृत्वात श्रीरामपुरात ‘अंमली पदार्थ विरोधी’ जनजागृती अभियान; निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या नेतृत्वात श्रीरामपुरात ‘अंमली पदार्थ विरोधी’ जनजागृती अभियान; निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीरामपूर (प्रतिनिधी):

अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाचे अधिनस्त श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन च्या वतीने आयोजित अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांन/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी दि. १८/०८/२०२६, १९/०८/२०२६ व दि. २०/०८/२०२६ अशा तीन दिवस विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहे. या अभियानात श्रीरामपूर शहर व परिसरातील अनेक शाळा, विद्यालय, महाविद्यालय सामील झाले आहे. अभियानानिमित्त शालेय व महाविद्यालयीन स्तरावर निबंध स्पर्धा नुकत्याच श्रीरामपूर चे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे यांचे नेतृत्वाखाली व डी.वाय.एस.पी. श्री. जयदत्त भवर यांच्या सहकार्याने रयत शिक्षण संस्थेचे चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आल्या. त्यांचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, मा. मीनाताई जगधने यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी श्री. विशाल खैरे, पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

​अध्यक्षस्थानावरून मनोगत व्यक्त करताना मा. मीनाताई जगधने यांनी नशामुक्त भारत करण्यासाठी अशा निबंध स्पर्धा अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले व निबंध स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.

​श्री. विशाल खैरे यांनी आपल्या मनोगतात पोलीस विभाग नशामुक्त भारत अभियानासाठी करत असलेल्या अथक परिश्रमाबद्दल माहिती दिली व तरुणाईला सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांनी रयत शैक्षणिक संकुलाच्या वतीने निबंध स्पर्धेसाठी आलेल्या सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे स्वागत केले व नशा मुक्त भारत अभियानासाठी आपण सर्व भारतीय कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

यावेळी श्रीरामपूर परिसरातील ७ वी ते ९ वी गटासाठी:

१. व्यसनमुक्त कुटुंब, सुखी कुटुंब

२. व्यसनमुक्त भारत, निरोगी भारत

३. नशा मुक्त समाज, काळाची गरज

४. नशा मुक्त शाळा, सुरक्षित विद्यार्थी

या विषयावर विद्यार्थ्यांनी निबंध लेखन केले.

​तर १० वी ते महाविद्यालयीन गटासाठी:

१. व्यसनास नकार, जीवनास होकार

२. व्यसनाचे दुष्परिणाम आणि उपाय योजना

३. व्यसनमुक्ती समाजाची सामूहिक जबाबदारी

४. व्यसनमुक्त भारतासाठी माझे योगदान

५. व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीची गरज

या विषयावर विद्यार्थ्यांनी निबंध लेखन केले.

​डॉ. डी. काचोळे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील साळवे यांनी सदर निबंध स्पर्धेचे यशस्वी संयोजन केले. या निबंध स्पर्धेत एकूण ५१८ निबंध स्पर्धकांनी भाग घेतला. कार्यक्रमासाठी श्री. दीपक त्रिभुवन, गट शिक्षणाधिकारी, श्रीरामपूर, श्रीमती शितल मुगडे, पोलीस निरीक्षक, श्री. रोशन निकम, पोलीस उपनिरीक्षक, एस. के. सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिका, सो. सोनाली पेठणे, उपप्राचार्य, डॉ. अनिकेत खत्री, विभागप्रमुख प्रा. विजय नागपुरे व प्रा. योगीराज चंद्रात्रे, प्रा. सारिका ऐरणे, प्रा. मयुरी जेजुरकर, प्रा. तृप्ती कोरडे, प्रा. संतोष तांबे व तालुक्यातील बहुसंख्या शाळा व महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख, डॉ. पोर्णिमा गुजर यांनी केले तर आभार प्रा. डॉ. संतोष धंगाळे यांनी व्यक्त केले.

​याच अभियाना अंतर्गत उद्या दि. १९/०८/२०२६ रोजी डी.डी. काचोळे, विद्यालय, श्रीरामपूर येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. दि. २०/०८/२०२६ रोजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे, तर एस.के. सोमय्या शाळेत रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

​तर दिनांक २१/०८/२०२६ रोजी सकाळी ०७.३० वा. आर.बी.एन.बी. कॉलेज मैदान येथून जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी तसेच शाळा, विद्यालय व महाविद्यालय यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!