**छत्रपती संभाजीनगरमधील खून प्रकरणातील आरोपींना नेवासा पोलिसांकडून अटक; गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई**

**नेवासा (प्रतिनिधी):**
छत्रपती संभाजीनगर येथील सिडको पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीची निर्घृण हत्या करून फरार झालेल्या दोन मुख्य आरोपींना जेरबंद करण्यात नेवासा पोलिसांना मोठे यश आले आहे. नेवासा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली असून, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी सिडको पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधील सिडको पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३५५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) प्रमाणे दिनांक ३० मे २०२६ रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले होते.
**गुप्त माहिती ठरली दिशादर्शक**
हे आरोपी नेवासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आले असल्याची गोपनीय माहिती नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांना मिळाली. माहिती मिळताच कोणतीही दिरंगाई न करता पोलीस निरीक्षकांनी तातडीने आरोपींच्या शोधासाठी एक विशेष पोलीस पथक रवाना केले नेवासा पोलीस स्टेशनची कारवाई
पोलीस पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतून खालील दोन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले:
१) प्रसन्नजित प्रमोद हिवाळे (वय २० वर्षे, रा. मुकुंदवाडी सिडको एन-२, छत्रपती संभाजीनगर)
२) अरुण पदमर्सिंग भुल (वय १९ वर्षे, रा. एन-७ ओम प्राथमिक शाळा, छत्रपती संभाजीनगर)
ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सिडको पोलीस स्टेशन (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) यांच्या पथकाच्या स्वाधीन करण्यात आले असून, या गुन्ह्याचा पुढील तपास सिडको पोलीस करत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. एम. सुदर्शन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे साहेब*, श्री. वैभव कलुबर्मे साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग श्री. निरज राजगुरु साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांनुसार करण्यात आली.
या कारवाईत नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले, पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील* पोलीस अंमलदार संतोष शिंदे नारायण डमाळे अतुल शेळके भारत बोडखे आणि महिला पोलीस अंमलदार **वर्षा कांबळे यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली. नेवासा पोलिसांच्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.