‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल!’ श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांचा गुन्हेगारांना कडक इशारा
**१२१ अट्टल गुन्हेगारांचे भरून घेतले इंट्रोगेशन फॉर्म; २ लाखांचे लिहून घेतले बंधपत्र**

श्रीरामपूर (अहिल्यानगर):
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा कमालीची ॲक्टिव्ह झाली आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मा. श्री. मुम्मका सुदर्शन (भा.पो.से.)यांच्या आदेशान्वये श्रीरामपूर विभागामध्ये गुन्हेगारांचे चांगलेच कान टोचण्यात आले आहेत.
अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे यांनी गुन्हेगारांना थेट आणि कडक शब्दांत इशारा दिला आहे की, “कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, आणि कायदा तोडून जर पुन्हा गुन्हेगारी करण्याचा प्रयत्न केला, तर पोलीस प्रशासन खाकीची कडक ताकद दाखवेल!”*

१३ पोलीस ठाण्यांमधील १२१ आरोपींची परेड
श्रीरामपूर अधीनस्थ (उत्तर अहिल्यानगर) भागातील तब्बल १३ पोलीस स्टेशन मधील खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, आणि आर्म ॲक्ट सारख्या गंभीर गुन्ह्यातील १२१ रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर करण्यात आले होते. या विशेष मोहिमेदरम्यान सर्व आरोपींची ‘ओळख परेड’ घेण्यात आली आणि त्यांचे कुटुंब, राहण्याचे ठिकाण, वापरत असलेली वाहने आणि मोबाईल नंबर अशी सर्व माहिती ‘इंट्रोगेशन फॉर्म’ मध्ये नोंदवून घेण्यात आली.
पुन्हा गुन्हा केल्यास २ लाखांचा दंड आणि थेट जेल!
भारतीय नागरिक संहिता कलम १२९ अन्वये कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पुढे सर्व गुन्हेगारांकडून प्रत्येकी २ लाख रुपयांचे बंधपत्र (बॉण्ड) लिहून घेण्यात आले आहे. पुढील २ वर्षांच्या कालावधीत जर या आरोपींनी कोणताही गुन्हा केला, तर त्यांच्याकडून हे २ लाख रुपये वसूल करून थेट न्यायालयीन कोठडीत (जेलमध्ये) रवानगी केली जाईल, अशी तंबी देण्यात आली आहे.

गुन्हेगारांना देण्यात आलेल्या कडक समज:
१) जामीन रद्द होणार: पुन्हा गुन्हा केल्यास पूर्वीच्या गुन्ह्यातील जामीन तातडीने रद्द केला जाईल.
२) तडीपार आणि मकोका: सुधारण्याची संधी न घेता पुन्हा गुन्हेगारी वळणावर गेल्यास थेट तडीपार किंवा मकोका (MCOCA) सारखी कडक कारवाई केली जाईल.
३) सोशल मीडियावर भाईगिरी बंद: सोशल मीडियावर ‘भाईगिरी’ किंवा दहशत पसरवणारे व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर कडक पाळत ठेवली जाईल.
४) दर मंगळवारी हजेरी: सर्व आरोपींना पुढील ६ महिने दर मंगळवारी सकाळी ११.०० वाजता अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम
सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविपोलीस प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगार गोटात प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत होत आहे.भागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर(श्रीरामपूर), कुणाल सोनवणे (संगमनेर), अमोल भारती(शिर्डी), आणि निरज राजगुरु*(शेवगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
पोलीस प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगार गोटात प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत होत आहे.