वरखेडच्या श्री लक्ष्मी देवीची मंगळवारी यात्रा,सर्व तयारी पूर्ण,यात्रा रहाणार सीसीटीव्हीच्या कक्षेत

वरखेडच्या श्री लक्ष्मी देवीची मंगळवारी यात्रा,सर्व तयारी पूर्ण,यात्रा रहाणार सीसीटीव्हीच्या कक्षेत

नेवासा(प्रतिनिधी – सुधीर चव्हाण )महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील वरखेडच्या श्री लक्ष्मी देवीची मंगळवारी ७ एप्रिल २०२६ रोजी यात्रा भरत असून यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांच्या स्वागतासाठी वरखेडनगरी सज्ज झाली असून यंदा यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी १६ सीसीटीव्ही कमेरे मंदिर परिसरात लावण्यात आले असल्याचे देवस्थानचे श्री कडूपाटील गोरे यांनी सांगितले
सोमवार दि.०६ एप्रिल  रोजी रात्री ०८:३० वा. होम कार्यक्रम होणार असून  मंगळवार दि.७ एप्रिल  रोजी मुख्य यात्रा आयोजित करण्यात आली आहे.मंगळवार यात्रेनिमित्त छबीना व प्रेक्षणीय शोभेचे दारुकाम होणार असून नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सर्व पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी सज्ज केली आहे.
यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,आरोग्य सुविधा,यात्रेकरूंसाठी निवारा,दुकानासाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे.
मंगळवार दि.०७/०४/२०२६ रोजी यात्रेनिमित्त सकाळी ११ वाजता पैठण येथुन कहार व भोई समाजाने आणलेल्या पालखीची पुजा ट्रस्टी व गावकरी यांच्या वतीने करण्यात येईल यात्रेनिमित्त परिसरातील तालुक्यातील डेपो तून जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष कडू पाटील गोरे यांनी सांगितले

श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री लक्ष्मी देवी ट्रस्टचे अध्यक्ष कडू पाटील गोरे,उपाध्यक्ष लक्षाधिश दाणे,सचिव
राजु शिरसाठ,सह सचिव रंगनाथ पवार,खजिनदार
रावसाहेब कुंढारे,विश्वस्त रामदास गोरे,सुरेश हारदे,
नवनाथ वाघ, रामचंद्र कुंढारे,किशोर शिरसाठ,सुरेश शिरसाठ,भगवान जगधने,देविदास शिरसाठ,बाळासाहेब आश्रु शिरसाठ यांनी केले आहे

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *