सातारा पोलीस अधीक्षकांना तात्काळ निलंबित करा; उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे खळबळजनक आदेश
मुंबई/सातारा:
साताऱ्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीवरून आणि गंभीर प्रकरणांमधील पोलीस ढिलाईवरून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज राज्य सरकारला अत्यंत कठोर आदेश दिले आहेत. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक (SP) यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी गृहविभागाला दिले आहेत.
नेमके प्रकरण काय?
साताऱ्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी मध्ये झालेला गोंधळ तसेच पोलिसांनी मतदारांना केलेले धक्काबुक्की तसेच मतदारांना मतदानापासून वंचित ठेवल्यामुळे तसेच मंत्र्यांना झालेल्या धक्काबुकीच्या घटनेमुळे आज विधान परिषदेमध्ये शंभूराजे देसाई यांनी साताराचे पोलीस अधीक्षक तसेच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेले वर्तन विधान परिषदेचे उपसभापती यांच्या निदर्शनास आणून दिल्याने विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गृह विभागाला निलंबन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे
राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ
उपसभापतींनी थेट पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिल्याने पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता गृह मंत्रालय यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधकांनीही या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले असून साताऱ्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुढील कारवाई काय?
नीलम गोऱ्हे यांच्या या आदेशानंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती नेमली जाण्याची शक्यता आहे.