श्रीरामपुरात ‘गुड फ्रायडे’ निमित्त ख्रिस्त यातनांचा जिवंत देखावा; भाविकांकडून भक्तिभावाने ‘उत्तम शुक्रवार’ साजरा

श्रीरामपूर (प्रतिनिधी):
प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जाणारा ‘गुड फ्रायडे’ अर्थात ‘उत्तम शुक्रवार’ श्रीरामपूर शहर आणि परिसरात मोठ्या भक्तिभावाने व धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने श्रीरामपूर येथील लोयोला सदन धर्मग्राम, टिळकनगर येथील संत कॅथोलिक चर्च आणि आगाशेनगर येथील डी. पॉल चर्चच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा जिवंत देखावा
या दिनाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्रीरामपूर येथील युवकांनी सादर केलेली ‘पवित्र क्रुसाच्या वाटेची’ जिवंत नाटिका. प्रभू येशू ख्रिस्तांना क्रुसावर चढवण्यापूर्वी सोसाव्या लागलेल्या यातनांचा हा हृदयद्रावक देखावा युवकांनी अत्यंत प्रभावीपणे सादर केला. लोयोला सदन, टिळकनगर आणि आगाशेनगर अशा तिन्ही ठिकाणी हा देखावा सादर करण्यात आला, ज्यामुळे उपस्थित भाविक भावूक झाले होते.
धार्मिक विधी आणि प्रवचन
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोयोला सदन धर्मग्रामाच्या प्रमुख धर्मगुरूंनी गुड फ्रायडेचे महत्त्व आणि प्रभू येशूंच्या त्यागाबद्दल माहिती दिली. क्रुसाच्या वाटेच्या नाटिकेचे सादरीकरण शुभम बारसे, रोहन गायकवाड, शेखर गायकवाड, संदेश रणदिवे, अविनाश रणदिवे, रोहन ठुबे, श्रेयस लोखंडे, समीर साळवे, प्रतिक गायकवाड, स्नेह रणदिवे, प्राजक्ता रणदिवे, प्रणिती त्रिभुवन, लुकस दिवे आणि शरद सोळस या युवकांनी केले. त्यानंतर येशू ख्रिस्तांनी क्रुसावर असताना उच्चारलेल्या अखेरच्या सात शब्दांवर प्रवचन देण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी श्रीरामपूर धर्मग्रामाचे धर्मगुरू रे. फा. प्रकाश भालेराव, रे. फा. रत्नाकार दुशिंग, रे. फा. मॅथ्यु परेरा, तसेच लोयोला दिव्यवाणीचे रे. फा. अनिल चक्रनारायण, रे. फा. जेकब गायकवाड, कॅथोलिक चर्चचे रे. फा. पिटर डिसोझा, रे. फा. ॲड्यु जाधव आणि आगाशेनगर येथील डी. पॉल चर्चचे रे. फा. फ्रको, रे. फा. शिजो उपस्थित होते. सोबतच संत लुक हॉस्पिटल, कनोसा हॉस्टेल, टिळकनगर आणि डी. पॉल येथील सर्व सिस्टर्स व मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते.
सेवा आणि नियोजन
उत्सव समितीच्या वतीने उपस्थित सर्व भाविकांसाठी साबुदाणा खिचडीचा अल्पोपहार ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेम्स पंडित, राजीव साळवे, सुरेश ठुबे, विलास बनसोडे, बबलू लोंढे, अशोक खंडागळे, दिपक कदम, भाऊसाहेब तोरणे यांनी परिश्रम घेतले.
तसेच चर्च कमिटीचे कमलाकर पंडित, विजय त्रिभुवन, सुरेश कोळगे, रावसाहेब संसारे, संदीप साळवे, रवि त्रिभुवन, रणजित लोखंडे, रवि लोंढे, लाजरस गायकवाड, पुष्पा कोळगे, लता बनसोडे, निर्मला अमोलिक, शोभा त्रिभुवन आणि राजेंद्र भोसले, प्रकाश निकाळे, अजय लोंढे, पी. एस. निकम, अक्षय ठुबे या सर्वांनी मोलाची सेवा बजावली.