भोंदू ‘कॅप्टन’ खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात सरकारी वकिलांचा धक्कादायक खुलासा

भोंदू ‘कॅप्टन’ खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात सरकारी वकिलांचा धक्कादायक खुलासा

नाशिक: स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणारा आणि दैवी शक्तीचा बनाव करून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. काल, मंगळवारी नाशिक सत्र न्यायालयाने त्याला २९ मार्चपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कोर्टात काय घडले?

  • नरबळीचा संशय: सरकारी वकिलांनी न्यायालयात अत्यंत धक्कादायक माहिती दिली. खरातच्या फार्महाऊसवर पिस्तुलाच्या ५ रिकाम्या पुंगळ्या सापडल्या असून, त्याने नरबळी दिला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
  • रिव्हॉल्व्हरवर राजमुद्रा: खरातकडे एक काळ्या रंगाचे रिव्हॉल्व्हर सापडले असून त्यावर राजमुद्रा आहे. हे रिव्हॉल्व्हर त्याने कुठून मिळवले आणि त्याचा वापर कुठे केला, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
  • वन्यजीव कायद्याचे उल्लंघन: खरात हा लोकांना वाघ आणि साप दाखवून घाबरवायचा. तसेच त्याच्याकडे हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी सापडल्याने त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत (Wildlife Protection Act) कारवाई होण्याची शक्यता आहे.
  • पीडित महिलांची वाढती संख्या: तपासादरम्यान आतापर्यंत ६ गुन्हे दाखल झाले असून, अनेक पीडित महिला आता तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत.

खरातची कोर्टातील प्रतिक्रिया

​न्यायाधीशांनी जेव्हा खरातला विचारले की, “तुम्हाला काही बोलायचे आहे का?”, तेव्हा तो मोजून पाच वाक्ये बोलला. त्याने “मला साप किंवा वाघाबद्दल काहीही माहिती नाही” असे म्हणत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. सुनावणी दरम्यान तो मान खाली घालून स्वतःच्या हाताची बोटे न्याहाळत उभा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *